Saturday 7 April 2012


केव्हांतरी   पहाटे ...


केव्हांतरी पहाटे अवचित जाग आली
ती धून बांसरीची स्पर्शून गात्र गेली

धुंदीत वात होता गंधित आसमंत
दंवचिंबल्या पहाटे स्वरभारला निसर्ग

ऐशा सुरम्य समयीं तू धून कानी येई
माझी न राहिले मी हरखून भान जाई

स्वर उदगमा पहाया मी सत्वरीं निघाले
वृक्षातळीं कदंबा मी जाऊनि स्थिरावे

अनुपम्य सोहळा मी, पाहीयला स्वनेत्रें
मन. चित्त, शब्द सारे ते मंत्रमुग्ध झाले

विसरुनी देहभाना मी राहीले पहात
होता मुकुंद तेथे 'अलगुज' वाजवीत...

-विवेक वाटवे

(ही कविता उगवे, ता. पेडणे, गोवा इथून प्रसिध्द होत असलेल्या 'यशवंत' या त्रैमासिकात यापूर्वी प्रसिध्द झालेली आहे.)

No comments:

Post a Comment

Enter Your Comments.